शाहबाज शरीफ यांचं दिवाळीनिमित्त हिंदू समुदायाला आवाहन; म्हणे, “प्रत्येकाला शांततेत…”
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तान व जगभरातील हिंदू समुदायाला शुभेच्छा दिल्या, मात्र भारताचा उल्लेख टाळला. त्यांनी शांततेसाठी हिंदू समुदायाला आवाहन केले. भारतीयांकडून त्यांच्या पोस्टवर टीका झाली. काहींनी पाकिस्तानातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याची मागणी केली. याशिवाय, शरीफ यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विचित्र वर्तनही चर्चेत आले आहे.