धक्कादायक! २० रुपयांसाठी जन्मदात्या आईची केली हत्या; पैसे देण्यास नकार देताच…
हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील जयसिंगपूर गावात एका मुलाने वीस रुपये देण्यास नकार दिल्यामुळे आपल्या आईची कुऱ्हाड घालून हत्या केली. आरोपी जमशेदला अंमली पदार्थांचे व्यसन होते. आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर जमशेदने रागाच्या भरात आईच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी जमशेदला अटक केली असून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.