‘अशी’ झाली राजाची हत्या; सोनम रघुवंशीबाबत पोलिसांचा खुलासा, सांगितला हत्येआधीचा घटनाक्रम!
सोनम रघुवंशीने तिच्या प्रियकर राज कुशवाहच्या मदतीने पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा आरोप आहे. ११ मे रोजी सोनम आणि राजाचे लग्न झाले होते. २ जूनला राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. सोनमने राज कुशवाहला लोकेशन पाठवून मारेकऱ्यांना मदत केली. राज कुशवाहने मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात अनेक खुलासे केले आहेत.