कुठे गेले प्राणीमित्र? भटक्या कुत्र्यांनी तरुणीच्या गालाचा लचका तोडला, १७ टाके पडले
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये २१ वर्षीय वैष्णवी साहू या विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. महाविद्यालयातून घरी येत असताना कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे तिच्या गालावर १७ टाके घालावे लागले. या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी सरकारकडे भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा होत असून प्राणीमित्रांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.