सरन्यायाधीशांवर फेकलेला बूट पोलिसांनी केला मालकाच्या स्वाधीन; गुन्हा दाखल नाही
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्यांना थांबवून पोलिसांच्या ताब्यात दिलं. बार काउंसिल ऑफ इंडियाने किशोर यांना निलंबित केलं आहे. खजुराहो मंदिरांवरील टिप्पणीमुळे किशोर नाराज होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली पण कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही.