वक्फ बोर्ड विधेयकातील ‘या’ दोन तरतुदींवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती, कायदा स्थगितीस नकार
सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक २०२५ मधील दोन महत्त्वाच्या तरतुदींना स्थगिती दिली. न्यायालयाने संपूर्ण कायदा स्थगित करण्याची मागणी फेटाळली. स्थगित केलेल्या तरतुदींमध्ये वक्फ बोर्डामध्ये बिगर मुस्लीम व्यक्तीच्या नियुक्तीची तरतूद आणि जिल्हाधिकाऱ्यांना जमीन वक्फची आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार यांचा समावेश आहे.