डॉक्टरच्या चुकीमुळे जुळ्या अर्भकाचा मृत्यू; डॉक्टरसह दोन नर्सवर कारवाई
तेलंगणातील इब्राहिमपट्टनम येथील एका खासगी रुग्णालयात पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर चुकीचे उपचार केले गेले. डॉक्टर अनुपस्थित असल्याने दोन नर्सनी फोनवरून माहिती घेऊन उपचार केले. या घटनेनंतर स्त्रीरोगतज्ज्ञ आणि दोन नर्सवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले.