“ते मला नोबेल देणार नाहीत, ते फक्त…”, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली टीका
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवले आहे. भारत-पाकिस्तानमधील संघर्ष रोखण्याचे श्रेय पाकिस्तानने ट्रम्प यांना दिले आहे. ट्रम्प यांनीही अनेक जागतिक संघर्षांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांनी नोबेल पुरस्कार फक्त उदारमतवादी लोकांना दिला जातो, अशी टीका केली आहे.