नेपाळपाठोपाठ तुर्कियेमध्येही सोशल मीडियावर बंदी; यूट्यूब, इन्स्टा, व्हॉट्सअॅपही बंद!
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीविरोधात Gen Z ने आंदोलन केल्यानंतर सरकारने १९ तासांनी बंदी उठवली. तुर्कियेमध्येही सोशल मीडिया साईट्स बंद करण्यात आल्या आहेत, ज्यात इन्स्टाग्राम, एक्स, यूट्यूब, व्हॉट्सअॅप यांचा समावेश आहे. तुर्किये सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा न करता ही कारवाई केली. तुर्कियेमध्ये CHP च्या मुख्यालयाबाहेर आंदोलनानंतर सरकारने इंटरनेट आणि सोशल मीडिया बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.