रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा ड्रोन हल्ला, अनेक विमानं उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर
युक्रेन आणि रशियामधील संघर्ष वाढतच चालला आहे. युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर ड्रोन हल्ला केला असून, हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो. कीव इंडिपेंडंटच्या माहितीनुसार, या हल्ल्यात रशियाचे ४० हून अधिक बॉम्बर जेट्स उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच, AFPच्या वृत्तानुसार, रविवारी रशियाच्या दोन पुलांवर मोठा हल्ला झाला ज्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे.