ट्रम्प यांचं पुढचं शस्त्र भारतीयांसाठीचा H-1b व्हिसा? यूएस खासदाराच्या पोस्टने चिंता वाढली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी २५ टक्के टॅरिफ लावून, नंतर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या सरकारमधील खासदार मारजोरिया टेलर ग्रीन यांनी H-1b व्हिसा रद्द करण्याबाबत भाष्य केल्याने भारतीय विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे ट्रम्प भारताविरोधात व्हिसाचं शस्त्र वापरणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.