ट्रम्प नरमले! पंतप्रधान मोदींचे केले कौतुक, व्यापार चर्चा सुरू करण्यास सकारात्मक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या आयातशुल्कामुळे दोन्ही देशांतील व्यापार चर्चा रखडली होती. ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी भारताविरोधात विधाने करत होते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी चीनचा दौरा करून पुतिन आणि जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांचे सूर बदलले. त्यांनी मोदींना चांगला मित्र म्हटले आणि व्यापार चर्चा पुन्हा सुरू होण्याचे संकेत दिले.