VIDEO : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या भाजपा नेत्यांवर हल्ला, खासदार मुर्मू रक्तबंबाळ
पश्चिम बंगालमधील पूरग्रस्त नागराकाटा परिसरात मदतकार्य करत असताना भाजपाचे नेते खगेन मुर्मू आणि आमदार डॉ. शंकर घोष यांच्यावर हल्ला झाला. दोन्ही नेत्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपाने तृणमूल काँग्रेसवर हल्ल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर पूरग्रस्तांची मदत न केल्याचा आरोप केला आहे. तर, राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरीचे आश्वासन दिले आहे.