HAROP Drone पाकिस्तानची हवाई हल्लाविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त करणारे HAROP ड्रोन आहे तरी काय?
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर कारवाई केली. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संरक्षण दलांनी तो हाणून पाडला. भारताने इस्रायली बनावटीच्या HAROP ड्रोनचा वापर करून लाहोरमधील हवाई हल्लाविरोधी संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. HAROP हे अत्याधुनिक आत्मघाती ड्रोन असून ते लक्ष्यावर अचूक हल्ला करण्यास सक्षम आहे.