डोनाल्ड ट्रम्प भारताला का लक्ष्य करत आहेत? रघुराम राजन यांनी टॅरिफ वाढीची सांगितली कारणे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के आयातशुल्कावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले की, आयातशुल्क लादण्याचा निर्णय व्यापार अर्थशास्त्राच्या पलीकडे जाऊन व्यापक धोरणाचा भाग आहे.