“२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीसाठी १०० रुपये घेता आणि पुन्हा…”, उच्च न्यायालयाचे ताशेरे
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांवर अवाजवी बिल आकारणी होत असल्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्य न्यायाधीश कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने रेस्टॉरंट असोसिएशनला विचारले की, ग्राहकांकडून एमआरपीपेक्षा अधिक पैसे घेत असताना सर्व्हिस चार्ज का लावला जातो. पाण्याच्या बाटलीचे उदाहरण देत, २० रुपयांची बाटली १०० रुपयांना विकली जाते, हे योग्य आहे का, असा सवालही केला.