‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवार म्हणाले…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आणि त्यांना पुन्हा विजयी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा मुख्यमंत्री केले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.