अंदमानातील आदिम जमातींची जनगणना; त्यांचे आदिमत्व महत्त्वाचे की, सरकारी विकास?
भारताच्या अत्यंत संवेदनशील आणि जैवविविधतेने समृद्ध अशा अंदमान-निकोबार बेटांवर जगातील सगळ्यात एकाकी आणि इतर मानवी समूहाशी आजवर कधीही संपर्कात न आलेल्या आदीम आदिवासी जमाती वसलेल्या आहेत. या जमाती स्वतःहून जगापासून वेगळं राहणं पसंत करतात आणि त्यांच्याशी इतर समाजाचा संपर्क टाळण्याचं धोरण केंद्र सरकारनेही २०१४ पासून स्वीकारलेलं आहे. पण, आता राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासमोर कठीण प्रश्न उभे ठाकले आहेत.