८ जेटविमाने, ३ राजवाडे आणि आता टिकटॉकमध्येही अबू धाबीच्या राजघराण्याची भागीदारी
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारातून अबू धाबीचं राजघराणं टिकटॉकच्या अमेरिकन व्यवसायात मोठी भागीदारी घेण्याच्या तयारीत आहे. शेख तहनून बिन झायेद अल नाह्यान यांच्या नेतृत्वाखालील एमजीएक्स (MGX) फंडला १५ टक्के मालकीहक्कासह संचालक मंडळावर एक जागा मिळणार आहे. यूएईच्या राजघराण्याचा सहभाग हा आधीच वादग्रस्त ठरलेल्या टिकटॉक कराराला नव वळण देत आहे, हा करार चीन मंजूर करणार की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.