भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राला युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ मध्ये स्थान !
भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ मध्ये समावेश करण्यात आला आहे. ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची असल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला. युनेस्कोचं ‘Memory of the World Register’ ही एक आंतरराष्ट्रीय यादी आहे. ही यादी जगभरातील अत्यंत मौल्यवान, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अमूल्य अशा दस्तऐवजांचा, ग्रंथसंपदांचा, हस्तलिखितांचा, चित्रफीत, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादींचा संग्रह जतन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.