बांगलादेश भारताशी जोडलेली नाळ का तोडतंय? बांगलादेशात इस्लामिक कट्टरतावाद वाढतोय का?
Bangladesh Dismantling Its Own History Post Hasina: दिग्गज दिग्दर्शक आणि साहित्यिक सत्यजित रे यांच्या बांगलादेशातील मयमनसिंह येथील वडिलोपार्जित घरावर सरकारकडूनच हातोडा पडल्यावर पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेशमधील बदलत्या सांस्कृतिक संबंधांवर चर्चा सुरु झाली आहे. शेख हसीना सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आणि नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.