२००० वर्षं प्राचीन मादक सौंदर्यवती क्लिओपात्राची समाधी खरंच सापडली आहे का?
क्लिओपात्रा (इजिप्तची शेवटची फॅरो आणि टॉलेमी घराण्यातील शासिका) हे नाव आजही इतिहासप्रेमींना भुरळ घालते. इतिहासातल्या या राणी भोवती अनेक कथा-दंतकथांचं जाळं विणलेलं आहे. तिच्या आरसपाणी सौंदर्यापासून ते तिच्या भावाशी झालेल्या विवाहाबद्दल किंवा तिच्या प्रेमकथेबद्दल अनेक बाबतीत या राणीचा इतिहास मोहित करणारा आहे. अलीकडच्या एका संशोधनात या गूढतेच वलय असणाऱ्या राणीविषयी आणखी एक पैलू समोर आला आहे. त्यामुळे तिच्या इतिहासाचे आणखी एक पान उलगडले गेले आहे. या रहस्यमय नायिकेची चक्क समाधी शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.