मुघलांनी दरबारात का ठेवली होती तब्बल २० हजार कबुतरं?
सध्या मुंबईतल्या कबुतरांनी धुमाकूळ घातला आहे. दादरसारख्या ठिकाणी कबुतर जिंकणार की दादरकर असा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळेच भारतीय समाजात या कबुतर पालनाचे प्रस्थ कधी वाढले हे जाणून घेणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. भारतात कबुतर हा पक्षी अगदी प्राचीन कालखंडापासून अस्तित्त्वात आहे. भारतीय राजसत्तेने कबुतरांचा वापर संदेशवहनासाठी मोठ्या प्रमाणात केला. परंतु, कबुतरांना खरे महत्त्व आले ते मुघल कालखंडात. मुघल काळात कबुतरपालन ही एक प्रतिष्ठेची कला मानली जात होती.