फरहान अख्तरचा १२० बहादुर चित्रपट आणि रेजांग ला युद्धातील वीर जवानांची अमर गाथा!
फरहान अख्तर याची मुख्य भूमिका असलेला १२० बहादूर हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाची कथा रेजांग ला युद्धातील वीर जवानांच्या सत्य घटनेवर आधारलेली आहे. मात्र, प्रदर्शनाआधीच या चित्रपटाला त्या सैनिकांशी संबंधित असलेल्या अहिर समाजाकडून विरोधाला सामोरे जावे लागत आहे. १९६२ साली चीनबरोबर झालेल्या युद्धाची सावली भारताच्या लष्करी इतिहासावर अजूनही गडद आहे.