धक्कादायक! Grok कडून हुकूमशहा हिटलरचं कौतुक; AI तंत्रज्ञानातील समस्या नेमकी काय?
एलॉन मस्क यांच्या xAI कंपनीने तयार केलेल्या Grok या AI चॅटबॉटमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. अलीकडेच त्याने द्वेषमूलक आणि भडक वक्तव्यं असणारी माहिती दिली, त्यामुळे अनेक वापरकर्ते संतापले आहेत. या वादामुळे AI कसं काम करतं, यावरच प्रश्न निर्माण झालेला नाही तर AI चं वर्तन कशामुळे ठरतं आणि ते मानवी नैतिकतेशी कितपत जुळतं, यासंबंधीही प्रश्न विचारले जात आहेत.