भारताचे अमेरिकेशी संबंध सुधारण्यात लॉबिंग फर्मने बजावली महत्त्वाची भूमिका?
अमेरिकेने आकारलेल्या दुपटीएवढ्या आयात शुल्कानंतर (टॅरिफ) भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये अतिशय तणाव निर्माण झाला होता. सुमारे दीड महिन्याच्या या तणावानंतर गेल्या आठवड्यात प्रथमच तणाव निवळण्याची चिन्हे दिसू लागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिका भागीदारीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली, तसेच या दोन्ही देशांमधील ‘विशेष नात्या’चे कौतुक केल्याने हा बदल दिसू लागला. भारत-अमेरिका संबंध ‘रीसेट’ होण्यामागे आंतरराष्ट्रीय राजकारणातील लॉबिस्ट जेसन मिलर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.