World Diabetes Day: मधुमेह टाळण्यासाठी डाॅक्टर्स स्वतः काय करतात? जाणून घ्या!
१४ नोव्हेंबर रोजी जागतिक डायबेटीस दिन आहे. रक्तातील वाढत्या साखरेचे प्रमाण ही जागतिक समस्या झाली आहे. शरीरातील ब्लड शुगर संतुलित ठेवण्यासाठी डॉक्टारांकडून वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देणारे डॉक्टर हेही आपल्याच सारखं धकाधकीचं जीवन जगत असतात. त्यामुळे आपल्या पेशंटला सल्ला देणारे डॉक्टर आपले आरोग्य कसं राखतात. शरीरातील साखर संतुलित राहावी म्हणून काय करतात? हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.