नेपाळ भारताचा भाग नाही तरीही गोरखा रेजिमेंट भारतीय सैन्याचा भाग कशी?
सध्या, Gen-Z आंदोलनानंतर नेपाळ चर्चेत आहे. या आंदोलनामुळे दोन दिवसात सत्तापालट झाला. त्यामुळे या गोष्टीचा भारतावर नक्की काय परिणाम होणार याचीही चर्चा रंगली आहे. नेपाळ भारताच्या शेजारील राष्ट्र असलं तरी त्याची भारताशी जोडलेली सांस्कृतिक नाळ कुणीही कितीही प्रयत्न केला तरी ती तोडता येणार नाही. त्यामुळे वर्तनामाचा तोच धागा पकडून भूतकाळात डोकावून पाहणं क्रमप्राप्त ठरतं. त्याच पार्श्वभूमीवर गोरखा रेजिमेंट भारतीय सैन्य दलाचा भाग कशी ठरली याचाच घेतलेला हा आढावा.