राजा अनंगपाल, लोखंडी स्तंभ आणि वासुकीचा शाप; ‘दिल्ली’ या नावामागची रोमांचक कथा काय सांगते?
चांदणी चौकचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून दिल्लीचे नाव बदलून ‘इंद्रप्रस्थ’ करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे भारताच्या आधुनिक राजधानीला थेट महाभारतकालीन संस्कृतीशी जोडण्याची जुनी मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली या शहराला ते नाव कसे पडले? खरंच दिल्ली हे मुस्लीम नाव आहे का? याचाच घेतलेला हा आढावा.