भारतात देशप्रेम तर पाकिस्तानात मात्र लष्करातील करिअरबद्दल छानछोकी आणि श्रीमंतीचे आकर्षण!
बहुतांश देशांमध्ये सैनिकी सेवा ही देशभक्तीचं प्रतीक मानली जाते. मात्र पाकिस्तानमध्ये ती तरुणांसाठी सर्वात आकर्षक करिअर निवड ठरली आहे. यामागे देशरक्षणाची तीव्र इच्छा हा महत्त्वाचा भाग नसून उपजीविकेची साधनं, सुरक्षितता, सत्ता आणि लाभ मिळवण्याची खात्री हा आकर्षणाचा भाग आहे. सैनिकी नोकरी म्हणजे सन्मान आणि ऐशोआरामाची खात्री, हेच तरुणांना भुरळ घालते.