जपानमध्ये पंतप्रधान मोदी यांना इच्छापूर्ती करणारी Daruma doll भेट म्हणून का मिळाली?
जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोरीनझान दरुमा-जी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी म्हणजे सेइशी हिरोसे यांनी एक दरुमा बाहुली भेट दिली. जपानमध्ये दरुमा बाहुली ही सुदैव आणि भविष्यातील समृद्धीचं प्रतीक मानली जाते. म्हणूनच या बाहुल्या जपानी दुकाने, रेस्टॉरंट्समधील शेल्फ आणि घरांमध्ये सर्वत्र दिसून येतात. गोल आकार आणि चेहऱ्यावर रागीट भाव असलेली ही बाहुली प्रत्यक्षात बोधिधर्म (जपानी भाषेत दरुमा) यांचं प्रतीक आहे.