पंतप्रधान मोदी करणार महाभारतातील कृष्णनीतीचा वापर; काय आहे ही नीति?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षा अधिक कडक करावी यासाठी सुदर्शन मोहिमेची आखणी करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. परंतु, हा संदर्भ देताना मोदींनी महाभारताचा उल्लेख केला आणि श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र कसं वापरलं हेही सांगितलं. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी महाभारतातील नेमका कोणता संदर्भ दिला हे जाणून घेणं नक्कीचं माहितीपूर्ण ठरणारं आहे.