पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारताच्या सीमेवरील शेवटचं गाव ठरलं पहिलं? हे कसं घडलं?
आज, १७ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारतातील माणा गावातील लोक बद्रीनाथाच्या चरणी पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. ते सांगतात, हा दिवस आमच्यासाठी पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यापुरता मर्यादित नसून आमच्या गावाला जी ओळख मिळाली आहे त्या प्रवासाची आठवण करून देणारा आहे. माणा हे गाव भारतातील सर्वात शेवटचं गाव म्हणून ओळखलं जात होतं. आता हेच गाव भारताच्या सीमेवरील पहिलं गावं म्हणून ओळखलं जातं.