२६ वर्षांची तरुणी बेपत्ता पण उलगडा झाला तीन खुनांचा; रत्नागिरीत नेमकं काय घडलं?
ऑगस्ट महिन्यात रत्नागिरीत २६ वर्षीय गर्भवती महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केली. भक्ती मयेकर घराबाहेर जाताना एका मैत्रिणीला भेटायला जात असल्याचं सांगून घरातून निघाली होती, मात्र ती पुन्हा कधीच परतली नाही. या बेपत्ता तक्रारीच्या तपासात पोलिसांना स्थानिक बारशी संबंधित धागेदोरे मिळाले आणि तिथे केवळ एक नव्हे, तर तब्बल तीन खुनांचा उलगडा झाला. नेमकं काय आणि कसं घडलं, जाणून घेऊ!