अमेरिकन शास्त्रज्ञांना लक्ष्य करणाऱ्या चिनी-रशियन एजंट्सचा पर्दाफाश
चीन आणि रशियाच्या महिला हेरांनी तथाकथित 'सेक्स वॉरफेअर'मध्ये (लैंगिक युद्धनीति) सहभाग घेतल्याच्या बातमीची जोरदार चर्चा सध्या जगभरात सुरू आहे. 'सेक्स वॉरफेअर'मध्ये आकर्षण, संबंध आणि विवाह यांचा वापर करून अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न चिनी आणि रशियन महिला गुप्तहेर करत आहेत.