शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्कार; मनोज बाजपेयी यांनी सोडले मौन; काय आहे नेमकं प्रकरण?
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यंदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. जवान या चित्रपटासाठी शाहरुख खानला सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये जल्लोष साजरा झाला, मात्र या निर्णयावर शंका उपस्थित करत अनेकांनी मनोज बाजपेयीचा अभिनय अधिक प्रभावी असल्याचं सांगितलं. स्वतः मनोज बाजपेयी यांनीही या पार्श्वभूमीवर मौन सोडत पुरस्कारांचा दर्जा आणि त्यामागील प्रक्रियेवर थेट बोट ठेवत, प्रश्नचिन्हच उपस्थित केलं आहे.