हिंदू मंदिरावरून थायलंड आणि कंबोडियामध्ये संघर्ष कशासाठी?
२८ मे रोजी थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील वादग्रस्त सीमारेषेवर संघर्ष निर्माण झाला, त्यात एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला. थायलंड आणि कंबोडियामधील सीमेचा वाद अनेक दशकांपासून सुरू आहे. परंतु, या वादाने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतले नव्हते. या वादाच्या केंद्रस्थानी प्रीह विहियर नावाचे एक प्राचीन शिवमंदिर आहे. १९६२ साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हस्तक्षेप करून निर्णय दिलेला असला, तरी हे मंदिर आणि त्याचा परिसर आजही वादाचा मुद्दा आहे.