१४ फुटांच्या मगरीला हरवणारी ‘ती’ वाघीण कोण होती? जाणून घ्या ‘मछली’ची अद्भुत गोष्ट!
रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाची ‘टायगर क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणार्या मछली या वाघिणीचा २०१६ साली वयाच्या १९ व्या वर्षी मृत्यू झाला. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील सुमारे ३५० चौरस मैलाच्या मुख्य क्षेत्रावर राज्य करणारी ही बंगालची वाघीण तिच्या धैर्य, चिकाटी आणि असामान्य संघर्षशक्तीमुळे पर्यटकांची आवडती झाली होती. सर्वसाधारण वाघाची मादी वयाच्या १५ वर्षांपर्यंत जगते. परंतु, मछली मात्र १९ वर्षांपर्यंत जगली. त्यामुळे वाघांच्या इतिहासात सर्वात जास्त जगणारी वाघीण म्हणून तिची नोंद आहे!