४०० किलोमाटर्सचा एका वाघिणीचा प्रवास; वनाधिकाऱ्यांचे डोळे का पाणावले?
ही गोष्ट फक्त एका क्षुल्लक प्राण्याची नाही. तर, अस्तित्त्वाची लढाई लढणाऱ्या वाघिणीची आहे, या वाघिणीचं नाव झुमरी. २०१८ साली झुमरी अनेक जंगलं, डोंगराळ भाग आणि मानवी वस्ती पारकरून छत्तीसगडच्या आचनकमार व्याघ्र प्रकल्पात येवून पोहोचली. या वाघिणीने मध्यप्रदेशातील बांधवगडपासून अचनकमारपर्यंत तब्बल ४०० किलोमीटर प्रवास केला. तिचा प्रवेश या अभयारण्याच्या संवर्धनाच्या इतिहासाला एक चांगली कलाटणी देणारा ठरला.