सोमनाथ मंदिर लुटण्यासाठी महमूद गझनीने ३०,००० उंटांवरुन पाणी का नेले?
इसवी सनाच्या १० व्या शतकापासून अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील घोडे पाळणार्या गटांनी मोठ्या संख्येने भारतावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या कालखंडात या आक्रमकांनी सोन्याची- मंदिरांची लूट केली. १२ व्या शतकानंतर भारतीय कृषी संपत्तीचं शोषण करण्यासाठी तसेच व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यसाठी सुलतानशाहींची स्थापना केली. परंतु, या धार्मिक दृष्टीकोनामुळे तांत्रिक परिवर्तनाकडे दुर्लक्ष होते.