७० किलो वजन घटवणाऱ्या महिलेचा कानमंत्र; कोणत्या ५ सवयी आयुष्य बदलू शकतात?
वाढतं वजन ही जागतिक समस्या आहे. अनेकांसाठी वजन कमी करणे हे कठीण काम असू शकतं, यासाठी बेचव पदार्थ, थकवणारे व्यायाम आणि केवळ आरंभशूर असणं यासारखी अनेक कारण असतात. पण, कधी कधी असे मोठे बदल करण्यापेक्षा साधे छोटे बदलही फायदेशीर ठरतात, हेच केट डॅनिएल या महिलेने ७० किलोपेक्षा अधिक वजन कमी करून दाखवून दिले. याबद्दल इन्स्टाग्राम पोस्टमधून तिने माहिती दिली. ती सांगते, तुम्ही रोजच्या आयुष्यातील ५ सवयी बदलल्या तरी जे अशक्य वाटते ते सहज शक्य होवू शकते.