लिपुलेख खिंडीतून होणाऱ्या भारत- चीन व्यापारावर नेपाळचा आक्षेप कशासाठी?
तब्बल पाच वर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील व्यापार लिपुलेख खिंडींतून पुन्हा सुरू होत आहे. मात्र शेजारील देश असलेल्या नेपाळकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. नेपाळने या प्रदेशावर दावा केला असून हेच या आक्षेपामागचे महत्त्वाचे कारण आहे. एका अधिकृत निवेदनात नेपाळ सरकारने म्हटले आहे की, नेपाळच्या संविधानात समाविष्ट केलेल्या अधिकृत नकाशामध्ये महाकाली नदीच्या पूर्वेला असलेले लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हे नेपाळचे अविभाज्य भाग आहेत.