जेनसोल इंजिनिअरिंगमध्ये ९०० कोटींची अफरातफर, सेबीच्या कारवाईनंतर प्रवर्तकांचा राजीनामा
जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडचे संचालक अनमोल सिंग जग्गी आणि पुनित सिंग जग्गी यांनी सेबीच्या बंदीनंतर राजीनामा दिला. सेबीच्या चौकशीत ९७७ कोटी रुपयांचा गैरवापर आढळला. कंपनीने ईव्ही खरेदीसाठी घेतलेल्या निधीचा वैयक्तिक वापर केला. सेबीने दोघांनाही शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली. अनमोल जग्गीने कंपनीच्या कर्जातून ४३ कोटींचा फ्लॅट खरेदी केला होता.