रितेश देशमुखने दिला घरच्या बाप्पाला निरोप, पत्नी जिनिलीयाने शेअर केला खास व्हिडीओ
आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरातील गणपती विसर्जन होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर बाप्पाच्या निरोपाचे क्षण शेअर केले आहेत. जिनिलीया देशमुखनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देशमुखांच्या घरच्या बाप्पाच्या निरोपाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशने बाप्पाची मूर्ती हातात घेतली असून, मुलं रियान आणि राहिलसोबत 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत आहेत. रितेश-जिनिलीया यांची जोडी आणि त्यांचे संस्कार चाहत्यांकडून नेहमीच कौतुकास पात्र ठरतात.