“नव्या सुरुवातीचा…”, रेश्मा शिंदेची लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवानिमित्त पोस्ट
मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदेने लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव नवऱ्यासोबत साजरा केला. 'घरो घरी मातीच्या चुली' मालिकेत जानकीची भूमिका साकारणारी रेश्मा खऱ्या आयुष्यातही सण उत्सव साजरे करते. तिने पारंपरिक लूकमधील फोटो शेअर करत "लग्नानंतरचा पहिला बाप्पा" अशी कॅप्शन दिली. रेश्माने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी पवनसोबत प्रेमविवाह केला होता. ती सध्या 'स्टार प्रवाह'वरील 'घरो घरी मातीच्या चुली' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.