Aishwarya Rai Bachchan Morning Routine: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. नुकतंच या अभिनेत्रीने तिच्या मॉर्निंग रुटिनबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
अभिनेता अभिषेक बच्चनला 'I Want To Talk' चित्रपटासाठी ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. मात्र, त्याच्यावर पैसे देऊन पुरस्कार घेतल्याची टीका झाली. अभिषेकने संयमीपणे उत्तर देत म्हटलं की, "मी कधीही पुरस्कार खरेदी केले नाहीत, हा पुरस्कार कठोर परिश्रमाने मिळाला आहे." त्याने टीकाकारांना अधिक मेहनत करून उत्तर देण्याचं वचन दिलं.
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या 'बिग बॉस' शोच्या मानधनाबाबत अनेक चर्चा होतात. 'बिग बॉस'चे निर्माते ऋषी नेगी यांनी सांगितले की, सलमान खान एका एपिसोडसाठी कोट्यवधी रुपये घेतो. सलमानवर पक्षपातीपणाचे आरोपही होतात, परंतु नेगी यांनी स्पष्ट केले की, सलमान स्वतःचं मत बनवतो आणि त्याला कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती केली जात नाही. मानधनाबाबत नेमके आकडे माहीत नसले तरी सलमान त्याच्या प्रत्येक पैशाचा हकदार आहे.
बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीनं आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. वयाच्या १४व्या वर्षीच त्यानं आई-वडिलांना गमावलं. आईच्या शेवटच्या क्षणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यानं तिला पाणी दिलं नाही, ज्याचा त्याला आजही त्रास होतो. आईच्या निधनानंतर तो आतून तुटला होता. अर्शदनं राज शमानी यांच्या पॉडकास्टवर या वेदनादायी आठवणी शेअर केल्या.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अनेकदा बॉडी शेमिंगला सामोरी गेली आहे. शाळेपासूनच तिच्या वजनावर टीका होत आली आहे, जी आजही सुरूच आहे. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती या टीकांकडे दुर्लक्ष करते. सोनाक्षीने २३ जून २०२४ रोजी झहीर इक्बालशी लग्न केले, ज्यावरूनही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ती सोशल मीडियावर सक्रिय असून, मजेशीर व्हिडीओ शेअर करते.
बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री यामी गौतम यांचा 'हक' चित्रपट शाहबानो प्रकरणावर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काहींनी कौतुक केले, तर काहींनी टीका केली. इमरान हाश्मीने स्पष्ट केले की, हा चित्रपट कोणत्याही समुदायावर टीका करत नाही. इमरानने आपल्या धर्मनिरपेक्ष कुटुंबाचा उल्लेख करत चित्रपटाच्या संतुलित दृष्टिकोनावर भर दिला. 'हक' चित्रपटाचे दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा यांनी केले असून, तो ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
माही विज आणि जय भानुशाली यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर माहीने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा पसरत होत्या. thou.ghtful16 या इन्स्टाग्राम पेजवर त्यांच्या विभक्त होण्याची पोस्ट शेअर झाली होती, ज्यावर माहीने कमेंट करत खोट्या बातम्या पसरवू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करेन, असे म्हटले. जयनेही लेक ताराबरोबरचा व्हिडीओ शेअर करत नात्यातील दुराव्याच्या चर्चांना खोटे ठरवले.
गेल्या काही महिन्यांपासून एआयमुळे नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा सुरू आहे. अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. अॅमेझॉननेही ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली असून, त्यात भारतातील ८०० ते १००० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कंपनीच्या PXT टीमने यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. अॅमेझॉनचे सीईओ अँडी जेस्सी यांनी एआयमुळे नोकरकपात होणार असल्याचे सूचित केले आहे.
'बिग बॉस १९'च्या घरात अलीकडेच 'वीकेंड का वार'मध्ये बसीर अली आणि नेहल चुडासमा घराबाहेर पडले. नॉमिनेशन टास्कमध्ये अशनूर कौर आणि अभिषेक बजाज वगळता सर्वजण नॉमिनेट झाले. कॅप्टनसाठी 'रेशन-कम-कॅप्टन्सी टास्क'मध्ये प्रणीत मोरेला सर्वाधिक २१ पॉइंट्स मिळाले. त्यामुळे प्रणीत मोरे 'बिग बॉस'च्या घराचा नवा कॅप्टन होणार आहे.
रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाची ‘टायगर क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणार्या मछली या वाघिणीचा २०१६ साली वयाच्या १९ व्या वर्षी मृत्यू झाला. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील सुमारे ३५० चौरस मैलाच्या मुख्य क्षेत्रावर राज्य करणारी ही बंगालची वाघीण तिच्या धैर्य, चिकाटी आणि असामान्य संघर्षशक्तीमुळे पर्यटकांची आवडती झाली होती. सर्वसाधारण वाघाची मादी वयाच्या १५ वर्षांपर्यंत जगते. परंतु, मछली मात्र १९ वर्षांपर्यंत जगली. त्यामुळे वाघांच्या इतिहासात सर्वात जास्त जगणारी वाघीण म्हणून तिची नोंद आहे!
Shukra Gochar Impact on Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला वैभव, संपत्ती, पैसा, भौतिक सुख, ऐशोआराम, आकर्षण आणि दांपत्य सुख यांचा कारक मानले जाते. त्यामुळे जेव्हा शुक्र ग्रहाच्या गतीत बदल होतो, तेव्हा या गोष्टींवर विशेष परिणाम होतो.
'द फॅमिली मॅन' ही मनोज बाजपेयीची लोकप्रिय वेबसीरिज आहे. दोन यशस्वी सीझन्सनंतर, तिसऱ्या सीझनची उत्सुकता अखेर संपली आहे. प्राईम व्हिडीओने तिसऱ्या सीझनचा टीझर व्हिडीओ शेअर केला असून, २१ नोव्हेंबरला हा सीझन प्रदर्शित होणार आहे. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी देशाच्या सीमांपलीकडून येणाऱ्या धमक्या आणि अंतर्गत संकटांशी झुंज देताना दिसेल. प्रेक्षकांना मनोज बाजपेयी आणि जयदीप अहलावतच्या अभिनयाची प्रतीक्षा आहे.
Govinda Gun Injury daughter Emotional Experience: बॉलीवूड गाजवणारा अभिनेता गोविंदा यांच्या मुलीने म्हणजेच टीना आहुजा हिने सांगितले की, तिच्या वडिलांशी संबंधित एक भयानक घटना घडली होती. अभिनेता गोविंदा यांनी चुकून स्वतःच्या पायाला गोळी झाडली होती. ही घटना मुंबईतील त्यांच्या घरात घडली. गोविंदांकडे परवाना असलेली रिव्हॉल्वर आहे. गोळी लागल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. उपचारानंतर गोविंदा पूर्णपणे बरा झाला. पण टीनासाठी तो दिवस अजूनही विसरणे कठीण आहे.
ज्युरासिक पार्क हा सिनेमा माहितच नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. ‘त्या’ मोठ्या डायनासोरनी काळजाचा ठोका चुकवला होता. आता कल्पना करा त्याच कालखंडातील महाकाय डायनासोरनी जर पृथ्वीवर पुन्हा पाय ठेवला तर? …काळाच्या गर्भात हरवलेल्या अशा एका महाकाय डायनासोरचा शोध चीनमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष घेतला आहे. मातीच्या थराखालून बाहेर आलेली ती हाडं म्हणजे जणू ‘ज्युरासिक वर्ल्ड’मधून थेट पृथ्वीवर परतलेली एक जिवंत कथाच आहे…
'बिग बॉस १९'मध्ये बसीर अली आणि प्रणीत मोरे यांच्यात वाद झाला होता. प्रणीतनं बसीरला घरातून आधी बाहेर जाण्याची धमकी दिली होती, ज्यावर बसीरनंही प्रत्युत्तर दिलं. बसीर घराबाहेर पडल्यावर प्रणीत भावूक झाला होता. बसीरनं सांगितलं की, त्यांची पैज कायम लक्षात राहील आणि तो माघार घेणार नाही. 'वीकेंड का वार'मध्ये बसीर आणि नेहल चुडासमा बाहेर पडले.
November Born PeoplePersonality: अंकशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव वेगळा असतो. जन्माचा वेळ माणसाच्या आयुष्याबद्दल खूप काही सांगतो. त्याचप्रमाणे जन्माचा महिना देखील व्यक्तिमत्त्वावर मोठा परिणाम करतो. महिन्याच्या आधारावर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, आवड-निवड सहज ओळखता येते. आज आपण नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांबद्दल बोलणार आहोत. त्यांच्या खास गुणधर्मांबद्दल, तसेच त्यांचे लकी नंबर आणि लकी रंग कोणते आहेत हेही जाणून घेऊया.
काही वर्षांपूर्वी भारतात ५जी इंटरनेट सुरू झाल्यानंतर मोबाईल कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा झाली, ज्यामुळे डेटा स्वस्त झाला. तशीच स्थिती आता AI जगतात निर्माण होण्याची शक्यता आहे. OpenAI ने ChatGPT Go प्लॅन मोफत उपलब्ध करून दिला आहे. ४ नोव्हेंबर २०२५ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत युजर्सला हा प्लॅन मोफत वापरता येणार आहे.
'बिग बॉस १९'मध्ये बसीर अली आणि नेहाल चुडासमा घरातून बाहेर पडले. त्यानंतर अभिषेक बजाज आणि अशनूर कौर नॉमिनेट झाले, परंतु कॅप्टन मृदुल तिवारीच्या निर्णयामुळे वाचले. त्यामुळे या आठवड्यात कुनिका सदानंद, नीलम गिरी, मालती चहर, शेहबाज, तान्या मित्तल, अमाल मलिक, प्रणीत मोरे, फरहान भट्ट आणि गौरव खन्ना नॉमिनेट झाले आहेत.
Light Bill Reduce Fridge Usage: थंडीचा ऋतू म्हणजेच हिवाला सुरू होताच अनेक लोक फ्रीजची सेटिंग बदलायचं विसरतात, त्यामुळे ओवरकूलिंग होते आणि वीजेचा खर्च वाढतो आणि भलंमोठं वीज बिल येतं. हिवाळ्यात आधीच तापमान कमी असतं, त्यामुळे फ्रीजला जास्तीची (उन्हाळ्यासारखी) मेहनत करावी लागत नाही. जर या काळात कूलिंग अॅडजस्ट केलं नाही, तर त्याचा तोटा तुमच्या खिशाला आणि फ्रीजलाही होऊ शकतो.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या पोएस गार्डन येथील घराला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. सोमवारी सकाळी पोलिसांना ई-मेलद्वारे ही माहिती मिळाली. पोलिस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पोहोचले, परंतु तपासणीत काहीच सापडले नाही. ई-मेल खोटे असल्याचे स्पष्ट झाले. सध्या सायबर क्राइम सेल तपास करत आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आल्यानंतर नोकऱ्यांवर परिणाम होणार असल्याची चर्चा होती. आता AIमुळे नोकऱ्या जात असल्याचं चित्र दिसत आहे. अॅमेझॉनने ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अॅमेझॉनमधील सर्वात मोठे नोकरकपात ठरणार आहे. अॅमेझॉनचे सीईओ अँडी जेस्सी यांनी करोना काळात कर्मचारी कपातीचा कार्यक्रम जाहीर केला होता.
28 October Shukra Nakshatra Gochar: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी राशी बदलून नक्षत्रात प्रवेश करतात आणि त्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर तसेच देश-विदेशावरही दिसतो. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्र ग्रह हस्त नक्षत्र सोडून चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. चित्रा नक्षत्राचे स्वामी मंगळ देव आहेत आणि ज्योतिषानुसार शुक्र आणि मंगळ यांची मैत्री आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. त्यांना भरपूर धन आणि समृद्धी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
How Many Rotis to Eat in a Day: भारतात खाण्याची गोष्ट निघाली आणि चपातीचं नाव आलं नाही, असं होऊच शकत नाही. घरचं जेवण असो, ऑफिसचं डब्यातलं जेवण असो किंवा लग्नसमारंभ चपाती सगळीकडे असतेच. बऱ्याच लोकांना चपातीशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. काही लोक सकाळ-संध्याकाळ दोन-दोन पोळ्या खातात, तर काहींना चार-पाच चपात्याही कमी वाटतात.
'बिग बॉस १९'मधून बसीर अली आणि नेहल चुडासमा बाहेर पडल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. बसीरने त्याच्या एक्झिटबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याने सांगितले की, त्याला शोमध्ये योग्य मार्गदर्शन मिळाले नाही आणि त्याच्यावर अन्याय झाला. सोशल मीडियावर चाहत्यांनीही बसीरच्या एक्झिटबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याला पुन्हा शोमध्ये आणण्याची मागणी केली आहे.
१२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'दशावतार' सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरनेही सिनेमाचं कौतुक केलं आहे. 'दशावतार'ने महाराष्ट्राबरोबरच जगभरातील प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. केरळमधील प्रेक्षकांच्या आग्रहाखातर हा सिनेमा मल्याळी भाषेतूनही प्रदर्शित होणार आहे.
2 November Horoscope Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी आपल्या स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीत प्रवेश करतात, तेव्हा ते राजयोग आणि शुभ योग तयार करतात. आज आपण शुक्र ग्रहामुळे तयार होणाऱ्या राजयोगाबद्दल जाणून घेणार आहोत.
२ नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह आपल्या स्वराशी म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या, या लकी राशी कोणत्या आहेत…
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे दोन राज्यांचे मतदार असल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, त्यांचे नाव बिहार आणि पश्चिम बंगालच्या मतदार याद्यांमध्ये आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, या वृत्तामुळे त्यांच्या विरोधकांना संधी मिळाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात त्यांचे नाव आहे, तर बिहारमध्ये सासाराम लोकसभा मतदारसंघात आहे.
Sanitary Pads Cause Cancer: महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सॅनिटरी पॅडचा वापर करतात, पीरियड्सच्या काळात आरामदायक आणि स्वच्छता राखण्यासाठी त्याचा वापर होतो. पण, वेळोवेळी असा प्रश्न विचारला जातो की, सॅनिटरी पॅड जास्त वेळ वापरल्याने कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो का? ही काळजी योग्यच आहे, कारण अनेक महिला तासनतास बाहेर असतात आणि पॅड बदलू शकत नाहीत.
वैवाहिक जवळीक नाकारणं आणि मुलाला जोडीदारापासून दूर ठेवणं हा मानसिक अत्याचार आणि क्रूरता असल्याचा निर्णय देत दिल्ली उच्च न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला. पत्नीने सहजीवनास नकार, वारंवार घर सोडणं, तक्रारी दाखल करणं, मुलाला दूर ठेवणं आणि सासरच्यांविषयी असंवेदनशीलता दाखवणं ही मानसिक अत्याचाराची ठोस उदाहरण असल्याचं न्यायालयानं म्हटलं.
Trigrahi Yog in November: नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह आपली राशी बदलणार आहेत. तसेच काही ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग तयार करतील. नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत त्रिग्रही योग बनणार आहे. हा योग ग्रहांचा सेनापती मंगळ, धनदायक शुक्र आणि ग्रहांचा राजा सूर्य यांच्या एकत्र येण्याने तयार होईल. या योगामुळे काही राशींचे नशीब उजळेल. त्यांना कामधंद्यात प्रगती मिळेल आणि बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. चला तर मग, पाहूया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
2026 Horoscope Ketu Grah: पापी ग्रह केतूने १८ मे २०२५ ला गोचर करून सिंह राशीत प्रवेश केला होता आणि सूर्याच्या राशीत राहून बरीच उलथापालथ केली. आता पुढच्या वर्षी म्हणजे ५ डिसेंबर २०२६ ला केतू गोचर करून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. डिसेंबर २०२६ मध्ये केतू चंद्राच्या राशी म्हणजे कर्क राशीत जाण्यापूर्वी वर्ष २०२६ च्या पहिल्या ११ महिन्यांत ४ राशीवाल्यांना मोठा फायदा देईल.