”मी हॉस्पिटलच्या जमिनीवर झोपले आणि…”, गोविंदाच्या मुलीने सांगितला धक्कादायक अनुभव…
Govinda Gun Injury daughter Emotional Experience: बॉलीवूड गाजवणारा अभिनेता गोविंदा यांच्या मुलीने म्हणजेच टीना आहुजा हिने सांगितले की, तिच्या वडिलांशी संबंधित एक भयानक घटना घडली होती. अभिनेता गोविंदा यांनी चुकून स्वतःच्या पायाला गोळी झाडली होती. ही घटना मुंबईतील त्यांच्या घरात घडली. गोविंदांकडे परवाना असलेली रिव्हॉल्वर आहे. गोळी लागल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. उपचारानंतर गोविंदा पूर्णपणे बरा झाला. पण टीनासाठी तो दिवस अजूनही विसरणे कठीण आहे.