Hiccups Reason and Solution: उचक्या त्रासदायक असू शकतात, कारण त्या अचानकच येतात. उचक्यांना ठोस कारण नसले तरी आपली खाण्यापिण्याची आणि जीवनशैलीची सवय नीट ठेवली, तर त्या टाळता आणि थांबवता येतात.
सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक २०२५ मधील दोन महत्त्वाच्या तरतुदींना स्थगिती दिली. न्यायालयाने संपूर्ण कायदा स्थगित करण्याची मागणी फेटाळली. स्थगित केलेल्या तरतुदींमध्ये वक्फ बोर्डामध्ये बिगर मुस्लीम व्यक्तीच्या नियुक्तीची तरतूद आणि जिल्हाधिकाऱ्यांना जमीन वक्फची आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार यांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील आंदोलनांसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले आहेत. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPR&D) कडे हे काम सोपवले असून १९७४ पासून झालेल्या आंदोलनांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. आंदोलनांमागील आर्थिक गणित आणि शक्तींचाही तपास केला जाणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत विशिष्ट पथक नियुक्त केले जाईल.
Today Horoscope 15 September: १५ सप्टेंबरचा दिवस खूप खास आहे. कारण आज २ मोठे ग्रह गोचर करत आहेत. या ग्रह गोचरामुळे ३ राशींना खूप धन आणि अनेक फायदे मिळतील. १५ सप्टेंबर २०२५ रोजी बुध आणि शुक्र गोचर करणार आहेत. बुध ग्रह गोचर करून आपल्या उच्च राशी कन्या मध्ये येत आहेत, जी धन, व्यापार, वाणी आणि बुद्धीच्या दृष्टीने खूप शुभ मानली जाते. तर विलास, धन-वैभव आणि भौतिक सुख देणारा शुक्र ग्रह गोचर करून सूर्याची रास सिंह मध्ये येत आहे.
पुण्यातील 'बॉलर' पबमध्ये रविवारी रात्री नेदरलँडचे नागरिक इम्रान नासिर खान यांच्या कार्यक्रमाला पाकिस्तानी कलाकार समजून आंदोलन करण्यात आले. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरल्यानंतर आंदोलक पबबाहेर जमले. पोलिसांनी मध्यस्थी करून कलाकार पाकिस्तानी नसल्याचे स्पष्ट केले. तरीही आंदोलकांनी गोंधळ घातल्याने १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
Dhan Shakti Rajyog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह आपली गती वेळोवेळी बदलतात. अनेकदा ग्रहांच्या या बदलामुळे शुभ आणि फायदेशीर योग तयार होतात. नोव्हेंबर महिन्यात शुक्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे धनशक्ती योग बनेल, जो ३ राशींसाठी खूप भाग्यशाली आणि लाभदायक ठरेल.
नोव्हेंबरमध्ये शुक्र ग्रहाचे गोचर महत्वाचे
वैदिक ज्योतिष शास्त्रात शुक्राला दैत्यांचा गुरु म्हटले आहे. हा ग्रह सुख, प्रेम, कला, ऐश्वर्य आणि वैवाहिक जीवन यांचा कारक मानला जातो. साधारणपणे २६ दिवसांनी शुक्र राशी बदलतो.
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीती मध्ये जीवनातील अनेक गोष्टी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने सांगितल्या आहेत. धर्म, न्याय, संस्कृती, राज्यकारभार, अर्थशास्त्र आणि शिक्षण याबद्दलचे त्यांचे विचार आजही तितकेच उपयोगी आहेत जितके ते पूर्वी होते. चाणक्य यांचे म्हणणे होते की त्यांच्या सांगितलेल्या नियमांचे पालन केले तर माणूस कोणत्याही अडचणीतून बाहेर पडू शकतो आणि यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो.
Ketu Gochar in December: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये केतु पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल. या गोचरामुळे काही राशींच्या लोकांना खास फायदा होईल. चला तर मग पाहूया, त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि त्यांना नेमका काय लाभ मिळणार आहे.
Toilet Mistakes: सकाळी उठल्यावर पोट नीट साफ नाही झालं तर दिवसभर कामात मन लागत नाही आणि शरीर अनहेल्दी असल्यासारखं वाटतं. काही खायची इच्छा होत नाही आणि पोट फुगलेलं, भरल्यासारखं वाटतं. चांगलं पचन आणि स्वच्छ पोट हा आपल्या आरोग्याचा पाया आहे.
आतड्यांचं आरोग्य (गट हेल्थ) फक्त पचनापुरतं मर्यादित नसून ते प्रतिकारशक्ती, ऊर्जा आणि एकूणच आरोग्यावर परिणाम करतं. आतड्यांचे आरोग्य (गट हेल्थ) बिघडले तर बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोटदुखी आणि कधी कधी गंभीर आजार होऊ शकतात.
दुबई येथे होत असलेल्या आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यावर विविध क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेनेने (ठाकरे) महाराष्ट्रात आंदोलनाची भूमिका घेतली आहे, तर पहलगाममध्ये बळी पडलेल्या कुटुंबाचे नातेवाईक बीसीसीआयवर टीका करत आहेत. मनोरंजन क्षेत्रातूनही प्रतिक्रिया येत असून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आजच्या सामन्यावर मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Loose Motion Stomach Infection:बदलत्या हवामानामुळे नवीन ताजेपणा आणि आराम मिळतो, पण पावसाळ्यात पाणी साचणे आणि ओलसरपणामुळे अनेक जंतू, विषाणू लवकर वाढतात; त्यामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आणि अनारोग्यदायी जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित आजार आणि इन्फेक्शन झपाट्याने वाढतात. अशा वेळी आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
भारतीय संस्कृतीत निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. तरीही निसर्गाची होणारी हानी आपल्याला रोखता आलेली नाही. परंतु, आपण एखादी गोष्ट मनात आणली तर त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची तयारी असली तर काय घडू शकतं, हे सांगणारी एक घटना ११ सप्टेंबर १७३० साली जोधपूरजवळील एका छोट्याशा वाळवंटी गावात घडली. एका धाडसी स्त्रीच्या नेतृत्त्वाखाली बिष्णोई समाजातील ३६३ जणांनी खेजडीच्या झाडांची होणारी तोड थांबण्यासाठी राजाच्या सैनिकांनी केलेले प्रहार झेलले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मणीपूरचा दौरा केला. या दौर्यादरम्यान मणिपूरचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मणिपूरचा उल्लेख भारताच्या स्वातंत्र्याचे द्वार असा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर मणिपूरचे ऐतिहासिक संदर्भ नेमकं काय सांगतात, याचाच घेतलेला हा आढावा.
Mars Transit on 23 September: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलत असतात, ज्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर आणि देश-विदेशावर दिसून येतो. २३ सप्टेंबर रोजी मंगळ देव राहूच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश करतील. या दरम्यान मंगळ तूळ राशीत असतील. अशा वेळी काही राशींना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच या काळात धन-संपत्तीमध्ये खूप वाढ होऊ शकते. याशिवाय देश-विदेश प्रवासाची संधीही मिळू शकते. चला तर मग पाहूया, कोणत्या आहेत या भाग्यवान राशी...
शिवसेना (ठाकरे) पक्षाने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळणे योग्य नाही, असे सांगून केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. संजय राऊत यांनी बीसीसीआय, भाजपा आणि जय शाह यांच्यावर टीका केली. भारतीय क्रिकेट संघालाही सामना खेळायचा नाही, परंतु दबावामुळे खेळत असल्याचा दावा त्यांनी केला.
Shani Gochar before Diwali: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी ग्रहाला नवग्रहांपैकी एक शक्तिशाली ग्रह मानलं जातं. शनी काही काळानंतर आपली राशी आणि नक्षत्र बदलतो. शनीला एका राशीतून परत येण्यासाठी सुमारे ३० वर्ष लागतात, आणि २७ नक्षत्रांमधून प्रवास करून परत त्याच नक्षत्रात यायला जवळपास २७ वर्ष लागतात.
सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. आता ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४९ मिनिटांनी शनी ‘पूर्वाभाद्रपद’ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो.
शिवसेना (ठाकरे) पक्षाने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळण्यावर विरोध दर्शवला आहे. संजय राऊत यांनी या सामन्याला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावे असे विधान केले होते, ज्यावर राऊत यांनी संताप व्यक्त केला आणि पवारांवर गंभीर आरोप केले.
Gajkesari Rajyog on 14 September Horoscope: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी चंद्र आणि गुरू एकत्र येणार आहेत, ज्यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग तयार होईल. गुरू आणि चंद्राच्या या गजकेसरी योगामुळे तीन राशींना खूप धन आणि ऐश्वर्य मिळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रात चंद्राला सगळ्यात वेगाने फिरणारा ग्रह मानलं जातं. तो सुमारे अडीच दिवसात एक रास बदलतो आणि या वेळेत इतर ग्रहांशी एकत्र येतो. अशा एकत्र येण्यामुळे काही वेळा शुभ आणि अशुभ योग तयार होतात.
चार्ली किर्क यांचा मृत्यू जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. शस्त्र बाळगण्याचा अधिकार मिळावा यासाठी लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची ख्याती होती. बुधवारी युटा व्हॅली विद्यापीठात भाषण देत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. ३१ वर्षीय किर्क यांच्या अशा मृत्यूमूळे अमेरिकेतील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतःकडे बंदूक बाळगणं ही अमेरिकेत एक सामान्य गोष्ट मानली जाते. अमेरिकेत लोकसंख्येपेक्षा बंदुकींचीच संख्या अधिक आहे.
Sleeping Late at Night: तुम्हाला कधी वाटलंय का की, उशिरापर्यंत जागं राहणं सोपं वाटतं; पण लवकर उठणं खूप कठीण असतं? पण तुम्ही असं वाटणारे तुम्ही एकटे नाही आहात आणि तुम्ही आळशीही नाही. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय, नवी मुंबई येथील न्यूरोलॉजी तज्ज्ञ डॉ. यतीन सागवेकर यांच्या मते, याचं कारण आपल्या मेंदूच्या रचनेत आणि नैसर्गिक जैविक घड्याळात दडलं आहे.
Mobile in Toilet Disease: आजकाल मोबाईल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक सतत मोबाईल वापरतात. एक दिवस फोन दूर ठेवला तर काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं.
आजकाल लोक मोबाईल टॉयलेटमध्येही नेतात आणि तिथे बराच वेळ बसून राहतात. पण, अलीकडच्या संशोधनानुसार टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्याची सवय ही काही साधी नाही, तर ती गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते. अभ्यासामध्ये आढळलं आहे की, टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणाऱ्यांना मुळव्याध होण्याचा धोका ४६% ने वाढतो.
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्त गावांना भेट दिली आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. पूरामुळे शेतं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोनूने गावकऱ्यांच्या अतिथीसेवेने भावुक होऊन सर्वांना एकत्र येऊन मदत करण्याचे आवाहन केले आहे. रणदीप हुड्डा, सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या कलाकारांनीही मदतीचा हात दिला आहे.
यूएईमधील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. यावरून शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीबाबतच्या आरोपाला उत्तर देताना, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांना लायकीत राहण्याचा सल्ला दिला.
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' फेम अभिनेत्री मंगल राणे आई झाली आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ३ ऑगस्ट रोजी तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. मंगलने तिच्या आईबरोबरचा आणि बाळाचा फोटो शेअर करत, "लेक जेव्हा आई होते, तेव्हा लेकीबरोबर आईसुद्धा नव्यानं आईपण जगते," असे म्हटले आहे. गेल्या वर्षी तिने फोटोग्राफर संतोष पेडणेकरसोबत लग्न केले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या महाजन यांनी पक्षात जबाबदारी न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली. त्यांनी राज ठाकरेंना मनातून काढू शकत नसल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत फक्त प्रचारासाठी वापरून घेतल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मराठी अभिनेता कुशल बद्रिके, 'चला हवा येऊ द्या' फेम, आपल्या विनोदी स्वभावामुळे लोकप्रिय आहे. तो सोशल मीडियावरही सक्रिय असून, पत्नी सुनयनाबरोबरचे फोटो-व्हिडीओ शेअर करतो. नुकताच त्याने सुनयनाबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आणि माझ्याकडे काहीही नसताना लग्न का केलं? असा प्रश्न विचारला. ज्याचं सुनयनाने उत्तर देत त्याच्या डोळ्यांचे कौतुक केले. या व्हिडीओला श्रेया बुगडे, अभिजीत खांडकेकर यांसह अनेकांनी प्रशंसा केली.
13 September Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळ ग्रहाला विशेष मान दिला जातो. तो साधारणपणे एका राशीत ४५ दिवस राहतो. सध्या मंगळ कन्या राशीत होता, पण १३ सप्टेंबर म्हणजे आज तो कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राची रास असल्यामुळे तूळ राशीत मंगळ आल्याने काही राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच, मंगळ आणि मिथुन राशीत असलेल्या गुरु बृहस्पतीच्या संयोगाने नवपंचम राजयोग तयार होत आहे.
सुबोध भावेने प्रिय मराठेबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. प्रिया मराठे, मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. ३१ ऑगस्ट रोजी तिचं निधन झालं. सुबोधने तिच्या अकस्मात जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि तिच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती दर्शवली. सुबोधने प्रियाबरोबरच्या कामाच्या अनुभवांबद्दल सांगितले आणि तिच्या गुणांचे कौतुक केले. त्याने मराठी इंडस्ट्रीने प्रियाची योग्य दखल घेतली नसल्याचेही नमूद केले.
Shani Favourite Zodiac Signs: कर्मफळ देणारा शनी ग्रह नवग्रहांमध्ये सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. तो एका राशीत सुमारे अडीच वर्ष राहतो. त्यामुळे एका राशीत परत यायला जवळपास ३० वर्षे लागतात. शनीला सर्वात क्रूर ग्रह मानले जाते कारण तो प्रत्येकाला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला दुःख, परिश्रम, अडथळे, आजार, दोष, विरोध, भीती, वार्धक्य, दान, आयुष्य, विकृत अवयव यांचा कारक मानले जाते.
कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत भरधाव वेगात ट्रक घुसल्याने ९ जणांचा मृत्यू आणि २० हून अधिक जण जखमी झाले. गुरुवारी रात्री मोसालेहोसल्ली गावात हा अपघात झाला. आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी 'दशावतार' सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत वडिलांची एक भावुक आठवण शेअर केली. ते म्हणाले, "मी सायन्सचा विद्यार्थी होतो आणि नोकरी करत होतो. नाटक-सिनेमा करताना धावपळ बघून वडिलांनी मला यातच करिअर करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला मी त्यांच्यावर चिडलो, पण नंतर पूर्णवेळ अभिनेता झालो. दुर्दैवाने, तेव्हा वडील नव्हते."