भारतीय खेळाडूवर सुनील गावसकर संतापले; म्हणाले, “तुम्ही प्रोफेशनल आहात..”
भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई येथे झालेल्या सुपर ४ फेरीतील सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य भारताने १८.५ षटकात पूर्ण केले. सुनील गावसकर यांनी भारतीय खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणातील चुकांवर नाराजी व्यक्त केली. शिवम दुबेने ४ षटकात ३३ धावा देत २ विकेट घेतल्या, ज्यात फरहानची महत्त्वपूर्ण विकेट होती.