“ऑस्ट्रेलियाला वाटलं की आणखी एक…”, टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर सेहवागची खोचक पोस्ट
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाला पराभूत करत टीम इंडियाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेमिमा रॉड्रिग्जच्या संयमी शतकामुळे भारताने ३३९ धावांचे आव्हान ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. विरेंद्र सेहवागने ऑस्ट्रेलियाला ट्रोल करत भारतीय महिला क्रिकेटपटूंचे कौतुक केले. आता अंतिम सामन्यात भारताची गाठ दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे, ज्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 